Scroll to top
  • +919420102722
  • Morning- 10.00 am - 2.00 pm, Evening- 6 pm - 9 pm

PCOD

नमस्कार. आज आपण काही योगासनं बघूया ज्यांचा PCOD साठी काही फायदा किंवा चांगला परिणाम होउ शकतो. मागच्या लेखात पाहिल्याप्रमाणे PCOD ही जीवनशैलीमुळे असलेली disorder आहे व ते पूर्णपणे ठीक होणे शक्य आहे पण त्याला काही औषधांबरोबर आपल्या प्रयत्नांची जोड हवी आणि त्यामध्ये खूप नियमितता हवी. वरील काही योगासनं यामध्ये उपयोगी ठरू शकतात. धनुरासन, भुजंगासन, सूर्य नमस्कार, नौकासन , पवन मुक्तसन आणि बद्धकोणासन(butterfly pose) ही ती आसन आहेत.
या असनांमुळे कमरेच्या भोवती जे स्नायू आहेत त्यांचा टोन चांगला होतो व ज्यामुळे insulin resistance जो PCOD मध्ये हार्मोनल imbalance साठी एक कारण असते ते कमी होण्यासाठी मदत होते.
स्ट्रेस हे पण एक कारण ज्यामुळे हार्मोन्स असंतुलित होतात तो पण कमी होण्यास मदत होते . तसेच ह्या असनांमुळे ovaries च्या भोवती आणि आजूबाजूच्या अवयवांना रक्तपुरवठा सुरळीत होतो व काही प्रमाणात PCOD ची लक्षणं कमी होण्यास मदत होते.
फक्त या प्रयत्नांमध्ये खूप नियमीत पणा हवा.
चला तर मग प्रयत्न करूया.

काहीही शंका असल्यास खलील क्रमांकावर संपर्क करू शकता
Health plus clinic
9420102722

Related posts